उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
माढा तालुक्यातील उपळवटे गावातील श्री काळभैरवनाथ यात्रेमध्ये मानाच्या कावडींचे आगमन झाले आहे. उजनी टे. गावचे बळीराम भिसे यांची मानाची कावड उजनी वरून दरवर्षी सालाबाद प्रमाणे श्री काळ भैरवनाथाच्या यात्रेमध्ये दाखल होते. पण कोरोनाच्या काळामध्ये या मानाच्या कावडीचे दर्शन झाले नाही. त्यानंतर आज पहिल्यांदाच उजनी गावच्या कावडीचे दर्शन घेण्यासाठी उपळवटे गावातून मोठा जनसमुदाय एकवटला होता. ही कावड उजनीमध्ये गुढीपाडव्याला उभी केली जाते. त्यानंतर उजनीवरून उपळवटे गावच्या श्री काळभैरवनाथाच्या यात्रेमध्ये दाखल होते.
उजनीच्या कावडीचे मानकरी बळीराम भिसे, संतोष कांबळे, भारत कसबे, दत्ता भिसे, अजय भिसे, ओंकार बोर्डे, दिगंबर गायकवाड, नितीन भिसे, सचिन भिसे, आकाश भिसे ह्या कावडीचा मान असल्यामुळे, त्या कावडीचे उपळवटे गावामध्ये आगमन झाल्याबरोबर उपळवटे गावातील पंच कमिटीने या कावडीचे स्वागत केले आहे.
यावेळी उपस्थित विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण खूपसे पाटील, विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे संचालक उद्धव माळी, भैय्यासाहेब घाडगे, उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील, उपसरपंच दीपिका महेश देवडकर, शिक्षण प्रेमी अशोक गरड पाटील, उपळवटे गावचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विशाल खूपसे, पाटील राहुल, घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेश देवडकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रेय बळीराम खूपसे पाटील, दिपक भैरवनाथ खूपसे पाटील, पाटील हनुमंत देवडकर, प्रशांत खुपसे पाटिल, महावीर खूपसे पाटील, नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment