Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी 

            देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत वीट येथे आजी-माजी सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना यशकल्याणीचे प्रा.गणेश करे-पाटील म्हणाले की, भारतभूमी ही पावित्र्य, समृध्द आणि शांतताप्रिय आहे. अशा आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची पर्वा न करता भारतीय जवान सैन्यदलामध्ये भरती होऊन भारतमातेची सेवा करतात. त्यांच्या त्यागाची तुलनाच होऊ शकत नाही. प्रमुख पाहुणे म्हणुन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले की, सैनिकांनी वीट या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. सैनिक आहेत म्हणून आपण आनंदात आयुष्य जगू शकतो. आपल्या तेजस्वी कर्तृत्वाला आणि तुमच्या कुटुंबियांच्या त्यागाला विनम्र अभिवादन करत, माजी सैनिकांना उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने व आनंदाने कुटूंबियांसोबत व्यथित करा असा प्रेमाचा सल्लाही दिला.


           वीट ग्रामपंचायतीने सर्व आजी-माजी सैनिकांचा गौरव केला. यामध्ये किरण नवनाथ ढेरे, सुर्यकांत ढेरे, संतोष रामा जाधव, देविदास कृष्णा जाधव, श्रीरंग कृष्णा गाडे, लालासाहेब सदाशिव गाडे, संदीप ढेरे, नवनाथ जाधव, जगन्नाथ जाधव, अनिल अंगद कांबळे, दिगांबर गिरी (गोसावी), गिरी दाजी, रेवन्नाथ बाळू जाधव, संतोष अर्जुन चोपडे, हेमंत जाधव, माउली बाळासाहेब जाधव, विमल राजेंद्र जाधव, मच्छिंद्र ढेरे, राजेंद्र सुधाकर ढेरे, संतोष लक्ष्मण शिंदे, सीमा दादा शिंदे, अशोक रामू ढेरे, दिगंबर जाधव, हनुमंत जाधव, मनोज शिंदे, संतोष जगदाळे, रेवन्नाथ बाळू राऊत, दिपक ढेरे, अतुल गणगे, उमेश पिंपळे, कौशल्या अरुण निंबाळकर, गंगुबाई पंढरीनाथ जाधव, अशोक छगन शिंदे आदि जवानांना सन्मानित करण्यात आले. 


           यावेळेस वीट पंचक्रोशीतील जनसमुदाय बहुसंख्यने उपस्थित होता. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब ढाणे, सरपंच वंदना ढेरे, उदय ढेरे, बाळासाहेब ढेरे, शिवाजी ढेरे, उपसरपंच अनुराधा कांबळे, शेख एस. एफ. ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभयसिंह राजेभोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन एच.यु जाधव यांनी केले.


Post a Comment