उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
माढा तालुक्यातील उपळवटे येथे दि 24/4/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची बालसभा उपळवटे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली असुन, या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेसाठी खेळाचे मैदान दुरुस्ती करून द्यावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, शौचालय दुरुस्ती करून द्यावी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अजून दोन संडास बाथरूमची आवश्यकता असल्याने त्वरित ती उपलब्ध करून द्यावीत. व इतर सोयी सुविधांची मागणी विद्यार्थ्यांनी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील व उपसरपंच दीपिका महेश देवडकर यांच्याकडे केली असून, लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील यांनी दिले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद पाटोळे सर यांनी केले. तर प्रास्ताविक ज्योतिराम तळेकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद सुरवसे सर यांनी केले, या बाल ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून इयत्ता आठवीचा विद्यार्थी किशोर शेळके, प्रमुख पाहुणे म्हणून आठवीची विद्यार्थिनी प्रगती लोंढे उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील व उपळवटे गावचे ग्रामसेवक बनाते भाऊसाहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून बाल ग्रामसभा समाप्त करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे सर, गुरुप्रसाद पाटोळे सर, प्रकाश भवर सर, ज्योतीराम तळेकर सर, अरविंद सुरवसे सर, हरिदास मुळीक सर, मंदाताई खोसे मॅडम, अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम, ढगे मॅडम, खूपसे मॅडम, देवडकर वस्ती शाळेचे मुख्याध्यापक माळी सर, बालाजी माळी गुरुजी, शिक्षण प्रेमी अशोक गरड पाटील, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष महेश देवडकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय बळीराम खूपसे पाटील, दिपक भैरवनाथ खूपसे पाटील, प्रकाश विश्वनाथ खूपसे पाटील, लक्ष्मण धर्मा जाधव, तानाजी गायकवाड, हुसेन कुचेकर, सुनील गवळी, प्रियंका संदीप घोरपडे, उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील, उपसरपंच दीपिका महेश देवडकर, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते विशाल खूपसे पाटील, राहुल घाडगे, दिलीप खूपसे पाटील, महेश गोसावी, तानाजी गायकवाड, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामपंचायत संगणक परिचालक अंगद शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment