करमाळा-प्रतिनिधी
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील शाळांमधील सायन्स वाॅलच्या रूपाने शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आणि आज त्या सगळ्यांनाच प्रेरित करतात. म्हणून यशकल्याणी परिवाराकडून करमाळा तालुक्यातील २२७ शाळांमधून बेस्ट सायन्स वॉल स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानुसार विजेत्या सर्वोत्तम १० शाळांचा सन्मान सोहळा दि.३० एप्रिल रोजी दुपारी ४ वा यशकल्याणी सेवाभवन येथे, पुणे विद्यापीठाचे मा.कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान सदस्य डाॅ.अरूण अडसूळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने डाॅ.अरूण अडसूळ साहेबांचे "भूमिकेचा धर्म निभावताना" या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. अशी माहिती यशकल्याणीचे प्रा.गणेश करे-पाटील यांनी दिली आहे. ही पारितोषिके फक्त करमाळा तालुक्यातील शाळांसाठीच आहेत. यशकल्याणी परिवाराकडून एकूण दहा क्रमांक काढण्यात आले आहेत. पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रूपये, द्वितीय क्रमांकासाठी अडीच हजार रूपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रूपये, चतुर्थ क्रमांकासाठी दिड हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी बाराशे रूपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पाच क्रमांक काढण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येकी एक हजार रू. पारितोषिक म्हणून देण्यात येईल. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन विजेत्या शाळांचा गौरव करण्यात येईल.




Post a Comment