करमाळा-प्रतिनिधी
करमाळा शहरातील किल्ला वेस नजीकची गटार गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेली असुन, गटारीचे घाण पाणी, शौचालयाचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शेजारीच कचरा पडलेला आहे. नगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. नगरपालिकेचे आरोग्य ठेकेदाराचे कामगार पंधरा-पंधरा दिवस या भागात फिरकत नाहीत. अनेक वेळा अधिकाऱ्याना सांगुन ही, या भागातील सफाई होत नाही.
फिनेल, जंतूनाशक पावडरची सहा-सहा महिने फवारणी होत नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक-१ मध्ये त्वरित गटारीची स्वच्छता करून, या भागात फिनेल, जंतूनाशक पावडरची फवारणी करण्यात यावी. अशी मागणी करमाळा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका बानु फारूक जमादार यांनी केली आहे.




Post a Comment