करमाळा-प्रतिनिधी
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देत डॉ. बाबासाहेबांनी दलित उद्धाराचे, पिचलेल्या समाजात नव्या जाणिवा निर्माण करण्याचे महान कार्य केले. ज्या समाजघटकावर सतत आघात होत असे, अशा समाजाला जागे करून अनिष्ठ रूढी, परंपरेच्या जोखडातून सोडविण्याचे कार्य केले. दलित समाज स्वतः जागृत व्हावा, असे प्रयत्न त्यांनी केले. राजकीय समानतेची हमी देशाला व भविष्याला मिळाली तरच लोकशाहीचे मंदिर टिकेल अन्यथा ते उद्वस्थ होईल, हा त्यांचा इशारा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. सर्वांना समान मत, सर्व मतांना समान पत हा लोकशाहीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मितीच्या माध्यमातून घातला आहे. तो अविरत स्मरणात ठेवला पाहिजे, माणसातील भेदभाव संपला तरच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने साकारतील असे प्रा.गणेश करे-पाटील म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती घोटीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत भारताचा पाया माझा भिमराया या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात विलास राऊत यांनी आंबेडकरांचे विचार जीवनामध्ये आत्मसात करण्यास प्रेरित केले. प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पंचायत समितीचे बी.डी.ओ. मनोज राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, पदाधिकारी, भिम सैनिक, महिला भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नागेश खरात यांनी केले.




Post a Comment