उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावच्या आठवडा बाजारामध्ये गरिबांचा फ्रीज माठ दाखल झाला असल्यामुळे, सर्व सामान्य नागरिकांची माठ घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. वरचेवर ऊन वाढू लागल्यामुळे गार पाणी पिण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना दहा ते पंधरा हजार रुपयांचा फ्रिज घेणे परवडत नसल्यामुळे, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य गरीब नागरिक माठ घेणे पसंत करतात. ऊन वाढुन घशाला कोरड पडलेली थांबण्यासाठी ह्या फ्रिज माठाचा उपयोग होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील गावोगावच्या आठवडा बाजारांमध्ये गरिबांचा फ्रीज माठ विकण्यासाठी येत असतात. ते माठ घेण्यासाठी सर्वसामान्य गरीब नागरिकांची गर्दी वाढलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे.
हि सर्व बाजारातील जवळून परिस्थिती पाहिली व अनुभवलेले सुशान चांदणे, रवींद्र खंदारे, सहदेव जगताप, विशाल जगताप, शंकर जगताप, राहुल कांबळे, दादा जगताप, आकाश जगताप, विकास साळुंखे, संदीप हवलदार, कोठावळे सर आदि जनांनी हि सर्व माहिती दिलेली आहे.




Post a Comment