Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी 

           महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना या अंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र कार्यालय बांधणीसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झालेला असून, सोलापूर जिल्ह्यातील एकूण 23 ग्रामपंचायतींचे कार्यालय बांधण्यास हा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


         करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील वाघाचीवाडी, दिलमेश्वर, राजुरी, शेडशिंगे, शिंदेवाडी व पापनस या 5 ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे एकूण 75 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील माढा ,पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर व सांगोला या तालुक्यांना प्राप्त झालेला आहे.


Post a Comment