Header Ads Widget

 



जेऊर-प्रतिनिधी

               कोंढेज ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद असून ग्रामविकास चळवळीत युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. कोंढेज ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोंढेज ग्रामपंचायतीचे वतीने केलेल्या एकुण 15 लाख 75 हजार रुपये निधीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच काही कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी सरपंच दादासाहेब लोंढे होते. तर यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, सरपंच छाया राऊत, उपसरपंच शहाजी राऊत, ग्रा. पं. सदस्य जालिंदर आदलिंग, गणेश सवाशे, गोविंद लोंढे, हनूमंत बादल, माजी उपसरपंच नाना आदलिंग, नागनाथ आदलिंग, आबासाहेब गायकवाड, साहेबराव राऊत, काका साबळे, गणेश सालसकर, पै. सनी लोंढे, संजय लोंढे, रज्जाक शेख, जेऊरचे सरपंच भारत साळवे, कांतीलाल आदलिंग, निवास महामुनी, निवास सालसकर, रेवणनाथ लोंढे, दत्ता आरणे, रेवणनाथ आरणे, भाऊसाहेब आरणे, शिवाजी लोंढे, पै. बबन माने, संतोष माने, शहाजी लोंढे, जालिंदर माने, रमेश वाघमोडे, संग्राम राऊत, इकबाल शेख, रामा माने, गणेश कोष्टी, अमीन तांबोळी, विजय आदलिंग, सोमनाथ सवाशे, शिवाजी खरात, गणेश खरात (ढोकरी), भाऊसाहेब सवाशे, सोमनाथ आरणे, अंबादास माने, चंदुशेठ बोराडे, महादेव बोराडे, रमेश उंबरे, संतोष करे, कृष्णा आरणे, रामभाऊ आदलिंग, काशीनाथ शिरस्कर आदि उपस्थित होते. 


           यावेळी बादल ते पवार घर सिमेंट रस्ता छबीना मार्ग(4.75 )लाख - लोकार्पण ,लोंढे बोळ पेविंग ब्लॉक रस्ता- लोकार्पण, बादल बोळ पेविंग ब्लॉक रस्ता- लोकार्पण, महादु लोंढे-सालसकर बोळ पेवींग ब्लाॅक रस्ता (तीन रस्ते एकुण 3 लाख) ,संजय लोंढे घर ते साबळे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे (2लाख),आंबेडकर नगर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे (5 लाख), भैरवनाथ मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे(७५ हजार) आदि विकासकामांचे भुमिपुजन व पुर्ण कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


          यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालूक्याच्या विकासातील ग्रामपंचायतींच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करुन, कोंढेज गावाशी स्व. कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांचेपासून असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख करत, कोंढेजकरांनी आपल्या राजकीय जीवनात दिलेल्या खंबीर पाठींब्याबद्दल आभार मानले. प्रास्तविक निवास महामुनी यांनी केले. सूत्रसंचालन निवास सालसकर यांनी केले तर आभार रमेश उंबरे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त माजी आमदार नारायण पाटील यांनी श्री भैरवनाथाचे दर्शन घेतले. ग्रामपंचायतीचे वतीने प्रसाद म्हणून भाविकांना पेढे वाटण्यात आले.

Post a Comment