Header Ads Widget

 



 
माढा ता.-प्रतिनिधी (अमोल हावळे)  

              वंचित बहुजन आघाडी माढा तालुक्यातील आणि कुर्डूवाडी शहरातील सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्र येत प्रथम लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुतळ्याचे दहन करण्यात आले.  आणि छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोक शाहीर आण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, अहिल्यामाता होळकर, माता रमाई, सावित्रीमाई फुले या महामानवांच्या घोषणा दिल्या. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भर सभेत असभ्य वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचीच प्रचिती आज कुर्डूवाडी शहरात ही निषेधाच्या माध्यमातुन व्यक्त होताना दिसुन आली.


                यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, तालुका कार्यध्यक्ष समर्थ आखाडे, तालुकाध्यक्ष दयानंद जानराव, कुर्डूवाडी शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के, आशपाक तैकल, माढा तालुकाध्यक्ष सुदेशन बेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment