करमाळा-प्रतिनिधी
कोविड काळात आंबेडकरी समाजाने संयम व आरोग्य यंत्रणा तसेच सरकारला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. तसेच लसीकरण देखील बहसंख्य अनूयायांनी करून घेतले आहे. तरी महाराष्ट्रात आंबेडकर जयंती हा प्रबोधनाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. तरी आंबेडकर जयंतीला कोविड प्रतिबंधक नियमांसह मिरवणूक तसेच प्रबोधन कार्यक्रमांना परवानगी द्यावी. अशी मागणी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी समाज भिमजयंतीची आतुरतेने वाट पाहत आहे. कोरोनाचे प्रमाण देखील आटोक्यात आले आहे. असे असताना महाराष्ट्रभर ठिकठिकाणी निवेदने जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवली जात आहेत. तरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी द्यावी. असे नागेश कांबळे यांनी म्हटले आहे.


Post a Comment