बार्शी-प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टीच्या वतीने बार्शी नगरपालिका मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांना निवेदन देण्यात आले. बार्शी नगरपालिकेने करापोटी नागरिकांची मालमत्ता जप्ती करण्यासंबंधात वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. सदर मालमत्तेची कोणत्याही प्रकारची स्वतः चौकशी न करता कर आकारणी केलेली आहे. बार्शीतील जनतेचे कोरोना काळामध्ये पार कंबरडे मोडले आहे. अशा अवस्थेमध्ये बऱ्याचशा नागरिकांना काम हि मिळेनासे झाले आहे. आणि आत्ता मालमत्ता जप्तीची नोटीस!!!! म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही मुख्याधिकाऱ्यांना, नोटीस रद्द करण्याची मागणी करत आहोत. निवेदन देतेवेळी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. कि सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही. सर्वसामान्यांना सवलत म्हणून टप्प्यांमध्ये कर भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. जर मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे.
यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष विलास शेरखाने, जिल्हा सचिव कांतीलाल भोसले, बार्शी शहराध्यक्ष सतीश परदेशी, बार्शी शहर कोषाध्यक्ष अक्षय बोकेफोडे, वडार भाईचारा अध्यक्ष परमेश्वर जाधव, वैराग शहर प्रभारी नागेश ठोंबरे, वैराग शहर अध्यक्ष ताजोदीन शेख, बार्शी विधानसभा सदस्य सतीश डोळसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment