Header Ads Widget

 



माढा ता.-प्रतिनिधी (अमोल हावळे)

              मौजे भोसरे येथील स्वस्त धान्य दुकान बी. व्ही. बागल यांच्याकडून 10 ते 20 नागरिकांना सांगण्यात आले कि, रेशनकार्डवर धान्य घ्यावयाचे असेल तर, अन्न-धान्य पुरवठा कार्यालय माढा येथील अधिकाऱ्यांना प्रत्येक नागरिकांनी 100 रूपये द्यावे लागतील. नाहीतर रेशनकार्ड वर धान्य मिळणार नाही. असे रेशन दुकानदारांने सांगितल्यामुळे, रेशन दुकानदाराकडे नागरिकांनी विश्वासाने प्रत्येकी 100 रूपये आणि सर्व कागदपत्र बागल यांच्याकडे जमा केली होती. तरी सुद्धा 1 वर्षापासून नागरिक धान्यापासून वंचित राहत आहेत. 


                  भोसरे येथील बागल यांचे स्वस्त धान्य दुकान महिन्यातुन फक्त 5 दिवस चालू असते. बाकीचे 25 दिवस दुकान बंद असल्यामुळे, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमानुसार आठवडी बाजारादिवशी दुकान चालू पाहिजे. तरीसुद्धा दुकान बंद ठेवले जात आहे. अन्न-धान्य पुरवठा कार्यालयातील कुठल्या अधिकाऱ्यांने पैसे घेतले? तो अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदार बागल मौजे-भोसरे यांची चौकशी झाली पाहिजे. धान्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना धान्य मिळाले पाहिजे. अशी नागरिकांमधुन मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

Post a Comment